पहिल्यांदाच सातासमुद्रापार जाणार जळगावची केळी

banana
जळगाव – अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील दर्जेदार केळीची निर्यात व्हावी हे शेतकऱ्यांचे स्वप्न होते. याबाबत ‘महाबनाना’ या संस्थेच्या पुढाकाराने एक दोन वेळा केळीची निर्यात करण्याचा प्रयत्नही केला गेला होता. केळीच्या इतिहासात प्रथमच जळगावची केळी खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचली आहे.

जिल्ह्यातील रावेर तालुक्‍यातील केळीला मध्यपूर्वेतील बहारीन या देशात बाजारपेठ मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर केळी निर्यातीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे लवकरच व्यापारी तत्त्वावर केळी निर्यातीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यातील केळीची आतापर्यंत उत्तर भारतातील बाजारपेठेत मक्‍तेदारी होती. गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्र यांनी जळगावच्या केळीशी स्पर्धा करायला सुरवात केली होती. याचा परिणाम खानदेशी केळीच्या मागणीवर व पर्यायाने भाव कोसळण्यावर झाला.

जळगावची केळी तीन वर्षांपासून पाकिस्तानला निर्यात होत आहे. मात्र येथील केळीला अरब देशात पोचविण्याचे स्वप्न जैन इरिगेशनचे होते. या आठवड्यात त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले. जैन इरिगेशनचे केळी शास्त्रज्ञ के. बी. पाटील व त्यांचे सहकारी राहुल भारंबे यांनी रावेर तालुक्‍यातील ग्रॅंड नाईन जातीच्या २० टनांचे दोन कंटेनर मे महिन्यात निर्यात करण्यात आली.

Loading RSS Feed

Leave a Comment