वैश्विक महामंदीचे राजन यांचे संकेत

raghuram
लंडन : पुन्हा जागतिक मंदीच्या संकटाचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिल्यामुळे केंद्रीय बँकांनी वैश्विक नियम तयार केले पाहिजेत. त्यातून निश्चितच मार्ग काढण्यास मदत होऊ शकते. परंतु ज्या प्रमाणे १९३० मध्ये जगाला आर्थिक महामंदीचा सामना करावा लागला होता. त्याच पद्धतीने पुन्हा जगाला आर्थिक महामंदीचा सामना करावा लागू शकतो, असे राजन यांनी म्हटले आहे.

अशा महामंदीला तोंड देण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी आर्थिक धोरण अधिक सुलभ बनवण्यावर भर दिला पाहिजे. भारतातील स्थिती मात्र वेगळी आहे. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व्याजदरात आणखी कपात करणे आवश्यक आहे. जगावर अजूनही आर्थिक महामंदीचे महासंकट घोंगावत असून, पुन्हा १९३० प्रमाणे आर्थिक महामंदीचा सामना करावा लागू शकतो. लंडनमध्ये आयोजित बिजनेस स्कूल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. चांगल्या स्थितीसाठी मुळात नियमावली बदलणे आवश्यक आहे. केंद्रीय बँकांचे कार्य सुव्यवस्थित पार पडण्यासाठी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे, याची एक नियमावली तयार केली पाहिजे. सध्या तीच वेळ येऊन ठेपली आहे. व्याजकपातीबाबत त्यांना विचारले असता जेवढे शक्य आहे, त्या पद्धतीने आपण कठोर भूमिका घेऊ शकलो. भारतात अजूनही गुंतवणूक वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही रघुराम राजन यांनी सांगितले. त्यासाठी केंद्रीय बँकांवर दबाव वाढविणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित आणि सुलभ बनविण्यासाठी तसे पाऊल उचलणे एक सकारात्मक पाऊल असेल, असेही राजन म्हणाले.

Leave a Comment