मोफत वायफाय सुविधा देणार गुगल

google
नवी दिल्ली : जगभर मोफत वायफाय सुविधा गूगल येत्या काळात उपलब्ध करून देण्याची तयारी करीत असून एवढेच नव्हे, तर न्यूयॉर्क शहरात ट्रायलही सुरू केल्यामुळे येणा-या काळात प्रत्येक देशात गूगलची वायफाय सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अँड्राईन मोबाईलधारकांना मोफत वायफाय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

जगभरात सध्या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच प्रमाणात भविष्यात इंटरनेट सुविधेची गरज भासणार आहे. भविष्यातील ही गरज लक्षात घेऊन गूगलने योजना तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्या दृष्टीने जगभर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही एक मोठी योजना असून, यासाठी बराच कालावधी लागणार आहे. परंतु गूगलने हे काम हाती घेतल्याने लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल, यासाठी योजना आखण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यूयॉर्कमध्ये ट्रायलही सुरू केली आहे. गूगल कंपनी या कामी गंभीर असून, त्यासाठी गूगलने साईडवॉक लॅब्स नावाची कंपनी सुरू केली असून, ही कंपनी न्यूयॉर्कमधील दोन सर्वांत वेगवान इंटरनेट सेवा देणा-या कंपन्या खरेदीची योजनाही आखत आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमध्ये वायफाय सुविधा देण्यासाठी बिग अ‍ॅप्पल्सच्या जुन्या फोन बूथचा वापर करण्यात येणार आहे.

Leave a Comment