मुलींना पाहून पोझ देणारा गोरिला

gorila
जपानच्या प्राणीसंग्रहालयातील एक गोरिला जपानी ललनांसाठी सध्या मोठेच आकर्षण ठरला असून हे महाशय तरूण मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. केवळ या गोरिला ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरूणी या प्राणीसंग्रहालयाला भेट देत आहेत आणि या गोरिलाचे फोटो काढून सोशल साईटवर टाकत आहेत.

हे महाशय मुली येताना दिसल्या की तरण्याबांड तरूणाप्रमाणे आपले मसल्स दाखवितो आणि चेहर्‍यावर लाजवाब भावही आणतो. शबानी नावाचा हा गोरिला १८ वर्षांचा आहे आणि त्याचे वजन आहे १८० किलो. २००७ साली तो ऑस्ट्रेलियातून हिगाशियामा झू अॅन्ड बोटॅनिकल गार्डन मध्ये आणला गेला आहे. आला तेव्हा हा गोरिला अगदी नॉर्मल म्हणजे सर्वसामान्य गोरिलांप्रमाणेच होता. मात्र कांही महिन्यानंतर त्याच्यातील तारूण्य जागे झाले आहे आणि आता त्याची वर्तणुक एकदमच बदलली आहे असे सांगितले जाते.

मुलींना पाहताच पोझ देणार्‍या या गोरिलासंबंधी तरूणी म्हणतात, तो खरोखरची सुंदर आहे. त्यामुळे त्याचे कितीही फोटो काढले तरी समाधान होत नाही आणि आमच्याकडे शबानी आहे हे दुसर्‍यांना दाखविण्याचा मोह आम्हाला आवरता येत नसल्याने त्याचे फोटो आम्ही सोशल साईटवर टाकतो आहोत.

Leave a Comment