चंद्रावर चालणार ऑडीची कार

audi
जर्मन कार मेकर ऑडीने त्यांची कार म्हणजेच रोव्हर २०१७ साली चंद्रावर उतरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. लूनर क्वाट्रो नावाचे हे रोव्हर पार्ट टाईम टेक्नॉलॉजी टीमच्या जर्मन इंजिनिअर्सनी तयार केले आहे. गुगलने यापूर्वीच लूनर एक्स नावाचे रोव्हर चंद्रावर उतरविले जाणार असल्याचे जाहीर केले असले तरी गुगलने त्यासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि स्पधर्कांकडून हे रोव्हर तयार करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

ऑडी तंत्रविकास बोर्डाचे सदस्य अल्रिक हॅकनबर्ग म्हणाले की आम्ही लाईटवेट टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रोनिक्स व रोबोटिक्स संबंधित या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. गुगलने जाहीर केलेल्या स्पर्धेशी स्पर्धा करणारी आमची ही एकटीच पार्टटाईम टीम आहे. या रोव्हरसाठी अॅल्युमिनियमचा वापर जास्त प्रमाणात केला गेला आहे. तसेच त्याला अॅडजेस्टीबल सोलर पॅनल दिले गेले आहेत. त्यामुळे चार इलेक्ट्रीक चाके हब मोटर्स चालवू शकतात. रोव्हरला दोन स्टिरियोस्कॉपिक कॅमेरे शिवाय १ सायंटिफिक कॅमेराही जोडला गेला आहे. या रोव्हरचा वेग तासाला ३.६ किमी इतका असेल.

हे रोव्हर २०१७ साली स्पेसमध्ये लाँच केले जाणार आहे. चंद्रावर पोहोचण्यसाठी त्याला पाच दिवसांचा प्रवास करावा लागेल आणि चांद्रमोहिमेतील शेवटचे यान अपोलो १७ जेथे उतरले होते त्याच जागी हे रोव्हर उतरेल असेही हॅकनबर्ग यांनी सांगितले.

Leave a Comment