कपातील कॉफीवरच उमटवा स्वतःची छबी

coffee
कॉफीचे मग, टी शर्ट इत्यादींवर स्वःतचा फोटो काढून घेण्याची स्टाईल आता जुनी झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण कपातील कॉफीवर स्वतःची सेल्फी केवळ १० सेकंदात उमटविणारे नवे मशीन तयार क रण्यात आले आहे. रिपल मेकर थ्रीडी तंत्रज्ञान व प्रिंट कॉफी एक्सट्रॅक्टला रिपल पॉटमध्ये साठवून ही कला साध्य केली जात आहे.

रिपल पॉटमध्ये साठविता येत असल्याने कस्टमाईज डिझाईन, टेक्स मेसेज, सेल्फी अथवा तुमच्या आवडीचा कोणताही फोटो कॉफीच्या फेसावर उमटविता येतो.हे डिव्हाईस वेबसाईट अथवा अन्य अॅपशी कनेक्ट करता येते. त्यामुळे ग्राहक ऑनलाईन लायब्ररीतून आपल्या आवडीचे डिझाईनही कॉफी फेसावर उमटविण्यासाठी निवड करू शकतो तसेच स्वतःचाच फोटो अपलोडही करू शकतो. हे प्रिटींग केवळ १० सेकंदात होते. या डिव्हाईसची किंमत ९९९ डॉलर्स आहे. मात्र प्रतिमहिना ७५ रूपये डॉलर्सने ते भाड्यावरही मिळणार आहे. या डिव्हाईसचे मुख्य ग्राहक म्हणून कॉफी चेन, बडे ब्रँडस व इनडिव्हीज्युअल कॉफी शॉप्स असे सर्वांकडेच पाहिले जात आहे.

Leave a Comment