अनेक वर्षे सुरू राहणार भारताची मंगळ मोहीम

isro
बंगळुरू – आगामी अनेक वर्षेपर्यंत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेली भारताची मंगळ मोहीम, मंगळयानात अजूनही भरपूर इंधन शिल्लक असल्याने चालणार आहे, असल्याचा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी केला आहे.

बंगळुरू शहरात विज्ञानावर आयोजित जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी आले असता, किरण कुमार पत्रकारांशी बोलत होते. मंगळ यानात अजूनही मोठ्या प्रमाणात इंधन शिल्लक असल्याने आणखी काही वर्षेपर्यंत ही मोहीम सुरू राहू शकते. स्पष्टच सांगायचे झाल्यास यानात ४५ टक्के इंधन शिल्लक आहे. जगातील सर्वात स्वस्त असलेल्या यानाला फार कमी इंधन लागत आहे. आम्ही ज्या वेळी मंगळयान अंतराळात पाठविले, त्यावेळी असलेला इंधनाचा साठा लक्षात घेता सहा आमची मोहीम महिन्यांपेक्षा जास्त टिकाव धरणार नाही, असे वाटले होते. पण, इंधनाचा वापर अतिशय कमी होत असल्याने ही मोहीम बरेच वर्षेपर्यंत चालणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीच्या काळात आम्हाला असेही वाटले होते की, यानाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. पण, तसेही काही झाले नाही. आमचे यान सुस्थितीत असून, त्याचे कार्यही उत्तम सुरू आहे. इंधनाच्या साठ्यावर आमचे बारीक लक्ष आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment