नेल्से घरोघरी जाऊन गोळा करणार मॅगी

maggi
टू निमिट नूडल्स मॅगीमध्ये प्रमाणाबाहेर शिसे आणि अजिनोमोटो आढळल्यानंतर नेल्से इंडियाने बाजारातून मॅगीची सर्व पाकिटे परत घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून आता घरोघरी असलेली मॅगीची पाकिटेही कंपनी गोळा करणार आहे. त्यासाठी कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आपला विश्वास आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा असल्याची टॅगलाईन असलेल्या या जाहिरातीत घरातील शिल्लक मॅगीची पाकिटे परत करण्यासाठीची माहिती दिली गेली आहे.

नेस्लेने ग्राहकांना या संदर्भातील माहिती मिळण्यासाठी मॅगी डॉट इन स्लॅश रिटर्न वर क्लिक केल्यास माहिती घेण्याविषयी सचना केली आहे. टोल फ्री नंबरही दिला गेला आहे. घरातील पाकिटे परत करताना ग्राहकाला एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यानुसार कंपनीचा प्रतिनिधी घरी येऊन पाकिटे गोळा करणार आहे. पाकिटांवरील किंमत ग्राहकाला रिफंड केली जाणार आहे.

Leave a Comment