लेनोवोने लॉन्च केला सर्वात स्वस्त फॅबलेट

lenova
नवी दिल्ली- सामान्य ग्राहकांचा कल स्वस्त आणि आकर्षक फिचर्स देणा-या स्मार्टफोनकडे वाढू लागला असून ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेऊन लेनोवोने सर्वसामान्यांना परवडणारा स्वस्त फॅबलेट लॉन्च केला आहे. या फॅबलेटचे नाव ‘के ३ नोट’ असे असून त्याची किंमत अवघी नऊ हजार ९९९ इतकी आहे.

या फॅबलेटमध्ये सर्वोत्तम एचडी डिसप्ले ३२ जीबीपर्यंतची एक्सपांडेबल मेमरी, फोर जी, दोन जीबी रॅम, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅश, पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन, अँड्रॉईड ५.० लॉलिपॉप, ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी हे अत्याधुनिक फिचर्स या देण्यात आले आहेत. येत्या ८ जुलैपासून फ्लिपकार्टवर ‘लिनोओ के ३ नोट’ या फॅबलेटची विक्री सुरू होणार आहे. हा फोन काळ्या आणि पांढ-या रंगामध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment