आता मोबाईल अॅपवर शाहू महाराजांचा जीवनपट

shahu-maharaj
कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराजांचे नाव जगभर ‘उक्तीला कृतीची जोड देणारा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. अनेकजण शाहू महाराजांना आदर्श मानून काम करणारे आपल्याला मिळतात. आता शाहू महाराजांचे विचार जगभर पोहचवण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत ‘राजर्षी शाहू’ हे अॅड्राईड अॅप्लीकेशन तयार केले आहे.

शाहू महाराजांनी केलेले लोकोत्तर कार्य, त्यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय या ‘अॅप’ च्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज जयंती उद्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे अॅप सर्वांना उपलब्ध होणार आहे.

‘फँटासॉफ्ट स्टुडिओ’मध्ये या अॅपची निर्मिती राकेश मधाळे आणि रफी मोकाशी या तरुणांनी केली आहे. आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अॅप तयार करुन शाहू महाराजांना मानाचा मुजरा केला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित हे पहिलेच अॅप असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तीन भाषेमध्ये ते उपलब्ध असून कोल्हापूरच्या पर्यटनाचीही माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment