शेवरले एफएनआर- भविष्यातली कार

chevro;et
जनरल मोटर्सने फ्यूचर कार म्हणून सेल्फ ड्रायव्हिंग कार तयार केली असून शेवरले एफएनआर असे तिचे नामकरणही केले आहे. सध्या ही कन्सेप्ट कार म्हणून तयार करण्यात आली असली आणि तिचे उत्पादन लगोलग सुरू केले जाणार नसले तरी या कारचे उत्पादन भविष्यात होऊ शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

कॅप्सूल डिझाईनवर आधारित या कारला ड्रॅगनफ्लाय स्विंग डोअर्स व क्रिस्टल लेजर हेडलाईटस दिले गेले आहेत. ही इलेक्ट्रीक कार आहे. या कारच्या सीट जागेवरच फिरू शकतात व आयरिस रेक्गनिझेशन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने फक्त डोळ्यांच्या इशार्‍यावर ही कार स्टार्ट करता येते. कारचे सेंन्सर्स व अपमाऊंटेड रडार मुळे सेल्फ ड्रायव्हिंगमध्येही आसपासची सर्व माहिती मिळू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment