रोबोंमुळे चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर कामगार कपात

robot
जगातील दोन नंबरची अर्थव्यवस्था म्हणून ओळख असलेल्या चीनमध्ये सध्या रोबोटिक क्रांती मोठ्या गाजावाजाने सुरू आहे मात्र त्यामुळे ९० टक्के कर्मचार्‍यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्याच महिन्यात गाँगडाँग भागातील दोन कंपन्यांनी औद्योगिक कामांसाठी रोबो तैनात केले असून त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांना घरी जाण्याची पाळी आली आहे.

इवनविन प्रिसिजन टेक्नॉलॉची या मोबाईल पार्ट बनविणार्‍या कंपनीने १००० औद्योगिक रोबो तैनात केले आहे तर गृहपयोगी वस्तूंची निर्मिती करणार्‍या एका कंपनीने १४ कर्मचार्‍याचे काम निपटण्यासाठी एक रोबो तैनात केला आहे. लवकरच क्वालिटी कंट्रोल सारख्या महत्त्वाच्या विभागातही रोबो काम करणार आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या माहितीनुसार चीन जगातला सर्वात मोठा इंडस्ट्रीयल रोबो बाजार आहे आणि चीन स्वतःसाठीही मोठ्या प्रमाणावर रोबो निर्मिती करत आहे. २०१७ पर्यंत युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या सहकार्याने जादा रोबो निर्मितीही केली जाणार आहे. तज्ञांच्या मते चीनमधील वाढती वृद्धसंख्या, कामगारांना द्यावी लागणारी पगारवाढ आणि मुख्य म्हणजे रोबो क्रांतीला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून मिळत असलेले समर्थन ही रोबोंचा वापर वाढविण्यामागची कारणे आहेत. शिवाय विविध सर्वेक्षणातून असे सिद्ध झाले आहे की रोबो जादा तप्तरतेने काम करतात आणि त्यामुळे देशाचा विकासदर किमान ०.३७ टक्कयांनी वाढण्यास हातभार लागतो.

Leave a Comment