फोक्सव्हॅगने लाँच केले सेडान वेन्टोचे नवे मॉडेल

vento
नवी दिल्ली- आपली मिडसाइझ कार सेडान वेन्टोचे नवे मॉडेलजर्मन कंपनी फोक्सव्हॅगनने लाँच केले आहे. भारतात फोक्सव्हॅगनच्या व्यापारास या कारमुळे वृद्धी मिळेल तसेच ही कार भारतात लोकप्रिय होईल असा विश्वास कंपनीच्या मायकल मायेर यांनी व्यक्त केला.

ही कार चार वेगवेगळ्या इंजिन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. ७.७० लाखांपासून ते ११.६४ लाखांपर्यंत या कारची किंमत आहे. अनेक नवीन सोयींनी युक्त अशी कार ही अत्यंत आरामदायक असल्याचे मायेर यांनी म्हटले आहे. मिडसाइझ कारमधील एक अत्यंत फ्युएल इफिशियंट कार म्हणून ही कार नावारुपाला येईल असे मायेर यांनी म्हटले.

Leave a Comment