गुगलविरोधातील याचिका फेटाळली

google
कॅलिफोर्निया : रस्त्यांचे दृष्य दाखविणा-या गुगलच्या स्ट्रीट व्ह्यु मॅपिंग सॉफ्टवेअरने पेटंटचा भंग केल्याची वेडेरी एलएलसीने गुगलविरुद्ध दाखल केलेली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

गुगलच्या स्ट्रीट व्ह्यु मॅपिंग नावाचे सॉफ्टवेअरद्वारे रस्त्यावरून चालणा-या मोटरींच्यावर कॅमेरे लावून यूजर्सना रस्त्यांचे दृष्य दाखविले जाते तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाहनांचे क्रमांक आणि रस्त्यावरील प्रवाशांचे चेहरे वगळले जातात. मात्र अशा पद्धतीने छायाचित्रण करण्याच्या पद्धतीमुळे आमच्या चार पेटंटचा भंग होत असल्याचा दावा करीत वेडेरी एलएलसी या कंपनीने गुगलविरुद्ध २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याबाबत ओबामा प्रशासनाकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. प्रशासनानेही गुगलच्या बाजूने प्रतिसाद दिला होता. मार्च २०१४ मध्ये जिल्हा न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर वेडेरीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Leave a Comment