खुल्या बाजारात फेसबुकने अनेक मोठ्या कंपन्यांना टाकले मागे

facebook
न्यूयॉर्क- वालमार्टपेक्षाही जगातील सर्वात मोठी सोशल मिडिया कंपनी फेसबुकची बाजारातील किंमत जास्त असल्याचे क्वार्ट्झने एका अहवालात सांगितले आहे. खुल्या बाजारात आल्यानंतर केवळ तीनच वर्षात फेसबुकने अनेक मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे.

फेसबुकच्या समभागांची किंमत ३० टक्क्यांनी वाढली आहे. फेसबुकची बाजारातील किंमत ही ६५ अब्ज डॉलर इतकी होती आता ती २३६ अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल चेन वालमार्टची किंमत २३५ अब्ज डॉलर आहे. महसुलाच्या आकड्यांकडे पाहिले असता वालमार्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी ठरेल. मागील वर्षी वालमार्टचा महसूल ४७६ अब्ज डॉलर होता. तर फेसबुकचा १२.५ अब्ज डॉलर इतका होता. अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या कंपन्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहेत.

Leave a Comment