अलीबाबाला अमेरिकन बाजारपेठेत जोरदार धक्का

alibaba
न्यूयॉर्क – अमेरिकन बाजारपेठेत ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अलीबाबाला दाखल होण्याच्या पहिल्याच प्रयत्नाला जोरदार धक्का बसला आहे. ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी अमेरिकन शेअर बाजारात ‘लिस्टेड’ होण्यासाठी अलीबाबाच्या प्रयत्नांना अपयश आले असून, अमेरिकन गुंतवणूकदारांनी या कंपनीला सपशेल नाकारले आहे.

‘११ मेन’ नावाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अलीबाबाने अमेरिकन बाजारपेठेत गेल्या वर्षी जून महिन्यात पाऊल ठेवले होते. अमेरिकन बाजारात मिळालेल्या थंड प्रतिसादानंतर अलीबाबाचे प्रमुुख जॅक मा यांनी ‘११ मेन’ विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी ‘ओपन स्काय’ नावाची अमेरिकन कंपनी खरेदी करणार असून, अलीबाबाही ‘ओपन स्काय’चे ३७ टक्के समभाग विकत घेणार आहे. विशेष म्हणजे, या सौद्याचा आर्थिक मसुदा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. अलीबाबा सारख्या मोठ्या कंपनीला हा झटका बसल्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

Leave a Comment