हाताच्या पेरावर मावणारे हेलिकॉप्टर

helicop
जपानच्या बंदाई कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या सीसीपीने हाताच्या बोटाच्या पेरावर मावेल एवढे हेलिकॉप्टर तयार केले आहे. खेळण्यातले हे हेलिकॉप्टर जपानमध्ये इंटरनॅशनल टोक्यो टॉय शोमध्ये सादर करण्यात आले आणि त्याची प्रात्यक्षिकेही दिली गेली. हा चिमुकल्या हेलिकॉप्टरचे नामकरण पिको फॉकन असे केले गेले आहे.

या खेळण्यातल्या हेलिकॉप्टरसाठी तयार केलेला इन्फ्रारेड रिमोटसुद्धा प्रत्यक्ष हेलिकॉप्टरपेक्षा मोठा आहे. हे हेलिकॉप्टर नॅनो फॉकनचे अपडेटेड व्हर्जन आहे. २०१३ ला नॅनो फॉकन बनविले गेले होते. नवीन हेलिकॉप्टरच्या पंखात सुधारणा केल्या गेल्या आहेत. ३० मिनिटांच्या चार्जवर हे ४ मिनिटे उडू शकते. नारंगी, हिरवा आणि निळा अशा तीन आकर्षक रंगात ते उपलब्ध असून त्याची किंमत आहे ४५ डॉलर्स म्हणजे साधारण २८०० रूपये.

Leave a Comment