भारतीय वंशाच्या निकेश अरोराला जपानच्या कंपनीचे ८६४ कोटींचे पॅकेज !

nikesh-arora
टोकियो : जपानची टेलिकॉम कंपनी सॉफ्टबँकने भारतीय वंशाच्या निकेश अरोरा यांना अध्यक्ष केले असून सध्या ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कंपनीने त्यांना गेल्यावर्षी १३.५ कोटी डॉलर्सचे (८६४ कोटी रुपये) पॅकेज दिले. यात सायनिंग बोनसचाही समाविष्ट आहे.

कंपनीच्या शेअरधारकांच्या बैठकीत अरोरांच्या पदोन्नतीचा निर्णय झाला. अध्यक्षपदासह त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) पदाची जबाबदारीही देण्यात आली. सॉफ्टबँकेचे चेअरमन व सीईओ मासायोशी सोन यांनी आधीच ४७ वर्षीय अरोरांना संभाव्य उत्तराधिकारी म्हणत ‘उगवता तारा’ या शब्दांनी संबोधले होते.

निकेश अरोरा यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सॉफ्टबँक जॉईन केली. त्याच्याआधी ते सुमारे वर्षे गुगलमध्ये होते. गुगल सोडताना ते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि चीफ बिझनेस ऑफिसर होते. आयआयटी-बीएचयुतून त्यांनी इलेक्टिड्ढकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यानंतर बोस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन येथून त्यांनी एमबीए केलेले आहे.

Leave a Comment