पहिलावहिला योग सूट लाँच

yogaclothing
आयकेट योग वेअर या क्लोदिंग कंपनीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्त साधून प्रयोग नावाचा पहिला योग सूट लाँच केला असून या सूटची किंमत वर घालण्याच्या टॉपसाठी १८९९ ते ३०९९ व पायजमासाठी १९९९ ते ३८९९ रूपये ठेवली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा सूट विशेष प्रकारच्या सिंथेटिक पासून बनविला गेला असून दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे फॅब्रिक तयार केले गेले आहे. भारतीय योगामध्ये परंपरेनुसार सैल व विनाशिलाईचे कपडे वापरण्याची पद्धत आहे.

कंपनीचे सहसंस्थापक व प्रॉडक्ट प्रमुख मलिका बरूआ यांच्या म्हणण्यानुसार आज योगासनांसाठी जे कपडे उपलब्ध आहेत, त्यात पॉलिस्टर व नायलॉन सूटचे प्रमाण ९० टक्के आहे. योगासने करताना या प्रकारचे कपडे योग्य नाहीत कारण त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो. आम्ही बनविलेला प्रयोग सूट विशेष सिंथेटिक कपड्यापासून बनविला आहे आणि या कपड्याचा त्वचेला स्पर्शच होत नाही तसेच शरीराच्या कुठल्याची अवयवावर त्याचा दाबही पडत नाही. या सूटचे डिझाईन तयार करताना ११ देशातील योगशिक्षक, टेक्स्टाईल इंजिनिअर्स, आणि योग आचरणात आणणारे नागरिक अशा सर्वांशी सल्लामसलत करून त्यांचे अनुभव लक्षात घेतले गेले आहेत.

रविवारी साजर्‍या झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासूनच हे सूट वेबसाईट उपलब्ध केले गेले आहेत.

Leave a Comment