रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधवांना नमाज पढत असताना फोनची रिंग वाजून व्यत्यय येऊ नये तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पडताना फोनची रिंग वाजल्याने इतरांनाही उपद्रव होऊ नये यासाठी गुगलने माय प्रेअर नावाचे डेव्हलप केले आहे. अँड्राईड फोनसाठी हे अॅप असून ते डाऊनलोड केल्यावर नमाजाच्या विशिष्ठ वेळेत फोनचा रिंगटोन वाजणार नाही. म्हणजे नमाज पढत असताना कॉल आला तरी फोन आपोआप सायलेंट मोडवर जाणार आहे. अनेक मुस्लीम बांधवांनी हे अॅप म्हणजे मुस्लीम बांधवांना रमजान निमित्त मिळालेली भेट असल्याची भावना व्यक्त केली आहे.
नमाजींसाठी गुगलची खास भेट- माय प्रेअर अॅप
रमजानच्या पवित्र महिन्यात दिवसातून पाच वेळा नमाज पढला जातो. त्याच्यासाठी विशिष्ठ वेळा असतात. मात्र अनेकदा नमाज पढत असतानाच फोनची रिंग वाजते. नमाज सुरू असताना तो थांबवून फोन घेता येत नाही अथवा फोन बंदही करता येत नाही. अशावेळी परतपरत रिंग वाजते व त्यामुळे अन्य नमाजींनाही आवाजाचा त्रास होतो. माय प्रेअर मुळे या समस्येतून सुटका होऊ शकणार आहे. त्यासाठी हे अॅप डाऊनलोड करून त्यात नमाजाची वेळ फिड करावी लागणार आहे. नमाज पूर्ण झाल्यावर म्हणजे सेट केलेली वेळ संपताच फोन पुन्हा सक्रिय होणार आहे.