गॅसवरील सबसिडी ‘आधार’ लिंक न केल्यास नाही मिळणार

pahal
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यत देण्यासाठी सुरू केलेली योजना ‘पहल’ (प्रत्यक्ष हस्तांरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त दहा दिवस उरले आहेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पहल’ असे नामकरण केले आहे.

या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी एलपीजी ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये आपला आधार ओळखपत्र क्रमांक लिंक करावा लागणार आहे. यामुळे गॅसवर मिळणारे अनुदान थेट आपल्या खात्यात मिळू शकणार आहे. या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीतील अनुदानासाठी जर तुम्ही आधार ओळखपत्र क्रमांक लिंक केला नसेल तर ३० जूनपर्यंत करू शकता.

या मुदतीत आधार लिंक न केल्यास १ एप्रिलपासून ३० जून या कालावधीतील अनुदान मिळणार नाही. याशिवाय ‘पहल’ योजनेंतर्गत आधार लिंक केल्यावर मिळणारे ५६८ रुपयांचेही अनुदानही मिळणार नाही. जे ग्राहक आधार लिंक करणार नाहीत, त्यांना एलपीजी गॅस बाजारभावाप्रमाणे खरेदी करावा लागणार आहे.यापूर्वी गॅस कंपन्यांनी मार्च महिन्यात आधार लिंक करण्यासाठी गॅस कालावधी दिला होता. या कालावधीत ग्राहकांना विनाअनुदानीत गॅस सिलेंडर दिले होते. सोबतच एप्रिल ते जून या कालावधीत आधार ओळखपत्र क्रमांक लिंक केल्यास अनुदान खात्यात जमा केली जाईल, अशी सूटही दिली होती.

Leave a Comment