गुगलचा सोली प्रकल्प बदलेल आयुष्याची परिमाणे

soli
माणसाचे आयुष्यच बदलून टाकेल असा एक प्रोजेक्ट गुगलने हाती घेतला असून त्याचे नामकरण सोली असे केले गेले आहे. यामुळे आपण वापरत असलेल्या इलेक्ट्रोनिक गॅजेटसचा वापर आणखी सहजसुलभ होऊ शकणार आहे. या प्रकल्पात त्यासाठी रडार तंत्रज्ञानाच्या मदतीने सेन्सर तयार करण्यात येत आहे. यामुळे केवळ बोटाच्या हालचाली करून १० हजार फ्रेम पर सेकंड वेगाने काम केले जाणार आहे.

जगात प्रथमच अशा प्रकारचा सेन्सर विकसित करण्यात येत आहे असा गुगलचा दावा आहे. कोणत्याही उपकरणात हे सेन्सर छोट्या चीपच्या स्वरूपात फिट करता येणार आहे. यामुळे केवळ बोटे हलवून संगीत बदलणे, स्मार्टफोन वापर, स्मार्टवॉचमध्ये वेळ सेट करणे अशी अनेक कामे होऊ शकणार आहेत. ही कामे करण्यासाठी उपकरणाला स्पर्श करण्याची गरज राहणार नाही. सेन्सर ज्यात फिट केला जाणार आहे ती मायक्रो चीप अगदी छोटी आहे.

सोलीची कल्पना गुगल एटीपीएचे इंजिनिअर एवन फुगरिफ यांची आहे. हाताच्या बोटांच्या हालचालींवरून त्यांना ती सुचली. ते म्हणतात आपले हात आणि बोटे इतकी कामे करत असतात त्यामुळे ती तंत्रज्ञानात बदलली तर दुनियेला नवे रूप आणि माणसाच्या आयुष्याची परिमाणे बदलता येतील असा विश्वास वाटल्याने हा प्रोजेक्ट हाती घेतला गेला आहे.

Leave a Comment