डुकाटीने लॉन्च केल्या ६ सुपरबाईक

superbaik
नवी दिल्ली : इटालियन सुपरबाईक निर्मिती करणारी कंपनी डुकाटीने भारतात धडाकेबाज एंट्री केली असून नुकतेच या कंपनी डुकाटीने ६ सुपरबाईक्सचे ११ व्हेरिएंट लॉन्च केले असून त्याचबरोबर भारतात जगातील सर्वात मोठे शोरुम उघडले आहे.

६ मॉडेल्सच्या एकूण ११ व्हेरिएंट डुकाटीने लॉन्च केले. डुकाटीच्या सुपरबाईक्सची किंमत ६ लाख ७४ हजारापासून सुरुवात होऊन १७ लाख ९० हजारांपर्यंत आहे. गुरगाव आणि मुंबईत शोरुम उघडून डुकाटी कंपनीने भारतीय बाजारात पाऊल ठेवले आहे. यानंतर बंगळुरुमध्ये ऑक्टोबरच्या महिन्यात शोरुम उघडले जाणार आहे. त्यानंतर गोवा, इंदौर, जयपूर, कोचीन, कोलकातामध्ये शोरुम उघडले जाणार आहे.