दहा सेकंदांत वैयक्तिक कर्ज देणार एचडीएफसी बँक

hdfc
नवी दिल्ली- आपल्या ग्राहकांसाठी दहा सेकंदात वैयक्तिक कर्जाची योजना देशातील दुस-या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आणली आहे.

अवघ्या १० सेकंदात पेपरलेस इन्स्टंट लोन प्लानमध्ये बँकेकडून ग्राहकांना कर्ज वितरित केले जाणार आहे. केवळ जुन्या ग्राहकांसाठी असलेल्या या योजनेमध्ये पूर्व मंजुरी असलेली कर्जाची रक्कम २४ तास उपलब्ध राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही पेपरलेस असणार असून नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून बँक खात्यात जाऊन एका क्लिकवर ही कर्ज रक्कम आपल्या खात्यात वळती करता येईल, असे बँकेने म्हटले आहे.

वैद्यकीय किंवा इतर अडचणीच्या प्रसंगात ग्राहकांना या योजनेचा विशेष फायदा होणार आहे. व्हच्र्युअल वॉलेटमध्ये असलेला हा एकप्रकारचा धनादेश आहे. ग्राहकांना एका क्लिकवर बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाचा हा एक भाग असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेचा डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म गोडिजटलअंतर्गत ही दुसरी सुविधा आहे.

Leave a Comment