कॅमेरूनच्या राजाला १०० राण्या आणि ५०० अपत्ये

anbebi-king
आफ्रिकेतील कॅमेरून येथील अम्बुबी द्वितीय राजाला १०० राण्या आणि ५०० अपत्ये आहेत ही बातमी ऐकून कदाचित धक्का बसेल मात्र हे सत्य आहे आणि त्यामागे कांही परंपरा व कारणेही आहेत. १९६८ साली पित्याचे निधन झाल्यानंतर बुफेटचा ११ वा राजा बनलेला अम्बुबी आपल्या मोठ्या परिवारासह आनंदाने राज्यकारभार करतो आहे.

या देशात बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे. ग्रामीण भागात एकापेक्षा अधिक लग्ने करणार्‍यांची संख्या मोठी आहे. राजाच्या महालाला येथे नतोह म्हटले जाते आणि येथे येणार्‍या पर्यटकांचे हे मोठे आकर्षणही आहे. विशेष म्हणजे हा महाल जगातील सर्वात धोकादायक वास्तूंच्या यादीत समाविष्ट केला गेलेला आहे.

येथील परंपरेनुसार राजा मरण पावला की राज्यावर येणार्‍या नवीन राजाने पहिल्या राजाच्या सर्व राण्याना त्याच्यासोबत ठेवावे लागते. अम्बुबीला याच प्रकारे १०० राण्यांचा लाभ झाला असून त्यातील ७२ त्याच्या वडीलांच्या राण्या आहेत. या राण्याही चांगल्या वक्त्या, अनेक भाषांच्या जाणकार आणि शिकलेल्या आहेत. बहुपत्नीत्व कायद्याला येथे अनेकवेळा आव्हान दिले गेले आहे त्यामुळे आता बहुपत्नीत्वाचे प्रमाण कमी झाले असले तरी राजा म्हणतो, ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामुळे राजानेच या प्रथांचे संरक्षण करून जनतेपुढे आदर्श ठेवायला हवा.

अम्बुबी सांगतो, त्याच्या सर्व राण्या त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. येथे राजाच मुख्य न्यायाधिकारी असतो आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ येथे बळीही दिला जातो.

Leave a Comment