सोनीचा एक्सपिरीया झेड थ्री प्लस २६ जूनला येणार

sonyz3
जपानच्या सोनी कंपनीने दिल्ली येथे होत असलेल्या इव्हेंटमध्ये एक्सपिरीया झेड थ्री प्लस लाँच करण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे. हा कार्यक्रम २६ जूनला होत असून त्याची निमंत्रणे पाठविण्याची सुरवात कंपनीने केली आहे. यापूर्वी जपानमध्ये हा फोन एक्सपिरीया झेड ४ नावाने सादर केला गेला आहे. आता या फोनच्या जागतिक लॉचिंगची तयारी सुरू आहे.

एक्सपिरीया हायएंड स्मार्टफोन सिरीजमधील फोनप्रमाणेच हा फोनही वॉटरप्रूफ आहे. त्याला ५.२ इंचाचा ट्रिलिनिमस स्क्रिन लाइव्ह कलर एलईडी डिस्प्लेसह दिला गेला आहे. फोनला ३ जीबी रॅम आहे तसेच इंटरनल मेमरी ३२ जीबी व ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही आहे. अँड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस,२०.७ एमपीचा रियर कॅमेरा, ५.१ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. फोनला एक्समोर आर सेंसर,२५ एमएम वाईड अँगल लेन्स असून ४ के व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची त्याची क्षमता आहे.

Leave a Comment