जबरदस्तीने लग्न लावण्यात भारत दुस-या क्रमांकावर

force
लंडन : ब्रिटनमध्ये राहणा-या मूळ भारतीय लोक जबरदस्तीने लग्न लावून देण्यात पुढे असल्याचा अहवाल समोर आला आहे. या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये राहून जबरदस्तीने लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा दुसरा क्रमांक लागत आहे. या गुन्ह्यात पहिल्या नंबरवर आहे पाकिस्तान आहे.

ब्रिटनमध्ये एका वर्षांपूर्वी जबरदस्तीने लग्न लावून देणे या कृत्याला गुन्हा ठरवले आहे. येथील फोस्र्ड मॅरिज युनिटने (एफएमयू) दिलेल्या माहितीनुसार त्यांनी वेगवेगळ्या देशांशी निगडित असलेली प्रकरणावर अहवाल तयार केला आहे.

यामध्ये पाकिस्तान (३८.३ टक्के), भारत (७.८ टक्के), बांगला देश (७.१ टक्के), अफगाणिस्तान (३ टक्के), सोमालिया (१.६ टक्के), तुर्की (१.१ टक्के) आणि श्रीलंका (१.१ टक्के) या देशांशी निगडीत लोकांचा जबरदस्तीने विवाह लावून देण्याचा कल असतो, असे एफएमयूने म्हटले आहे.
हिंसाचार आणि शोषण प्रकरणांना रोखण्याशी संबंधित विभागाचे मंत्री कॅरेन ब्रॅडली यांच्या म्हणण्यानुसार, पीडितांना योग्य पद्धतीने सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही जबरदस्तीने लग्न लावून देणे हा गुन्हा ठरविला आहे. शिवाय यातून अशी कृत्ये संपूर्णत: अस्वीकार्य आहेत आणि ब्रिटनमध्ये हे खपवून घेतले जाणार नाही, असाही संदेश यातून गेला.

ब्रिटनमधल्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीचे त्याच्या मर्जीविरुद्ध लग्न लावणे किंवा त्याला भाग पाडणे हा दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यासाठी ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.