आयशर पोलारिसची बहुपयोगी पीयूव्ही मल्टीक्स

eishar
आयशर मोटर्स आणि अमेरिकन कंपनी पोलारिस इंडस्ट्रीज यांनी भारतात पर्सनल युटिलिटी व्हेईकल मल्टीक्स सादर केली आहे. ही गाडी दोन व्हर्जनमध्ये असून तिची जयपूर येथे विक्रीही सुरू झाली आहे. या गाडीची किंमत आहे २ लाख ३० हजार रूपये.

ज्यांना व्यवसायानिमित्त वारंवार हलके सामान वाहून न्यावे लागते त्या व्यवसायिकांसाठी ही गाडी अतिशय उपयुक्त आहे. कारण यात सामानासह पाच जणांना बसता येईल इतकी जागा आहे. गाडीला ३ किलो पॉवरटेक ऑप पॉईंट दिला गेला असून त्याच्या लाईटचा वापर अनेक कारणांसाठी करता येतो. या लाईटच्या सहाय्याने घरात अथवा कार्यालयात प्रकाश मिळतो तसेच ड्रिलिंग मशीन, पाण्याचा पंप अथवा डिजे चालविता येतो.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.सिद्धार्थ लाल म्हणाले की भारतात वारंवार हलके सामान वाहून नेण्याची गरज पडणारे सुमारे ५.८ कोटी व्यावसायिक आहेत, त्यांना ही गाडी फारच उपयुक्त ठरू शकणार आहे आणि आमचे लक्ष्य हे ग्राहकच आहेत.