‘मोदी अॅप’द्वारे साधा थेट पंतप्रधानांशी संवाद

app
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमांतील आपली उपस्थिती आणखी लोकाभिमुख करण्यासाठी नवे पाऊल टाकले असून त्यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाइल अॅप’ लाँच केले. या माध्यमातून युजर्सना महत्त्वाची माहिती, सरकारी घोषणा, योजनांची माहिती तत्काळ मिळवता येईल. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेले मेसेज आणि ईमेल थेट मिळवता येईल. अँड्रॉइड ओएसवरील या अॅपचा उद्देश हा लोकांना मोदींशी थेट संवाद आणि विचार तसेच सूचना शेअर करण्याची संधी देणे हा आहे.

ट्विटरवरून अॅपची घोषणा मोदी यांनी केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहे. चला, मोबाइलद्वारे सर्व कनेक्ट होऊया. या अॅपमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करता येईल. तुमच्या फीडबॅकचेही आम्ही स्वागत करतो.

या अॅप्लिकेशनच्या विवरणात म्हटले आहे की, हे अॅप डाऊनलोड करा व कुठेही ताजे अपडेट्स मिळवा. नरेंद्र मोदी अॅपच्या वैशिष्ट्यांत ताज्या बातम्या आणि अपडेट्ससोबतच थेट ईमेल व मेसेज मिळवता येईल. याशिवाय मन की बातमध्ये थेट पंतप्रधानांसोबत संवाद साधता येईल.

Leave a Comment