मायक्रोमॅक्सने लाँच केला स्लीम स्मार्टफोन

canvas
नवी दिल्ली – सर्वात स्लिम बॉडी असलेला नवा कॅन्व्हास सिल्वर ५ हा स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी असलेल्या मायक्रोमॅक्सने लाँच केला असून केवळ ५.१ मिमी इतकी या स्मार्टफोनची जाडी आहे.

१७ हजार ९९९ रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. जिओनी इलाईफ एस५.१, लेनोव्हो वाईब एक्सटू आणि वनप्लस या स्मार्टफोन्सना हा फोन जोरदार टक्कर देईल. मायक्रोमॅक्सचा हा दुसरा फोरजी स्मार्टफोन आहे.

कसा आहे मायक्रोमॅक्स ‘कॅन्व्हास सिल्वर ५’
»४.८ इंच एएमओएलईडी डिस्प्ले »दोन जीबी रॅम »आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा »पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा »अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप »१६ जीबी इंटरनल मेमरी »किंमत – १७ हजार ९९९ रुपये

Leave a Comment