बिल गेट्‌सच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

bill-gates
न्यूयॉर्क – पुन्हा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्‍वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्‌स स्वबळावर श्रीमंत ठरले आहेत. तब्बल ८६ अब्ज डॉलर्सची त्यांच्याकडे संपत्ती असल्याची माहिती आहे.

जगातील व्यक्तींच्या संपत्तीविषयी माहिती देणार्‍या ‘वेल्थ-एक्स’ या संस्थेने ही यादी तयार केली आहे. या यादीनुसार अमेरिकेचे गुंतवणूकदार व उद्योजक वॉरेन बफे ७०.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर स्पेनचे अमानसियो ओर्टेगा ६५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. जगातील पहिल्या १० श्रीमंत व्यक्तींमध्ये फेसबुकचे मालक-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचाही समावेश आहे. वेल्थ-एक्सच्या या यादीत अमेरिकन उद्योगपतींचाच दबदबा आहे. या यादीतील २५ पैकी १४ जण अमेरिकन उद्योगपती आहेत. या १४ उद्योगपतींची संयुक्तपणे संपत्ती ५१४.२ अब्ज डॉलर्स आहे, जी नॉर्वेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. या यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेश आहे.

Leave a Comment