खास नवसांसाठीची खास मंदिरे

gurudwara
देवाच्या दारी जाऊन इच्छापूर्तीसाठी नवस बोलण्याची परंपरा फार प्राचीन आहे. आधुनिकीकरणाचे वारे कितीही जोरात वाहू लागले असले तरी अजूनही देवाकडे मागणे मागायला पर्याय मिळालेला नाही. त्यात थोडा बदल जरूर झाला आहे तो म्हणजे कांही विशिष्ठ मनोकामनेसाठी विशिष्ठ देवळांची स्थापना झाली आहे. अशाच कांही मंदिरांची ही मनोरंजक माहिती.

पंजाबमधील दोआबा प्रांतात तल्हान गांवात उभारले गेलेले गुरूद्वारा ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांची मनोकामना पूर्ण करणारे आहे असा भाविकांचा विश्वास आहे. हे गुरूद्वारा संत बाबा निहालसिंग शहिदा यांना समर्पित आहे. येथे परदेशी जाण्याची कामना असलेले भाविक मन्नत मागतात आणि त्यासाठी खेळण्यातले विमान वाहतात. बहुतेकांची परदेशवारीची इच्छा त्यामुळे पूर्ण होते. परिणामी या गुरूद्वाराबाहेर खेळण्याची दुकानेच दुकाने आहेत.

visa-mandir
याच प्रंमाणे हैद्राबाद जवळ असलेल्या मेहदीपट्टनम मध्ये असलेले चिलकुर बालाजी मंदिर व्हिसा साठी प्रसिद्ध आहे. ज्यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळत नाही ते येथे येऊन व्हिसा मिळाल्यास १०८ प्रदक्षिणा घालण्याचा नवस बोलतात. या मंदिरात दान पेटी अथवा हुंडी नाही. केवळ पार्किंग चे पैसे आकारले जातात आणि त्यातून मंदिराचा खर्च भागतो. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे मंदिर उघडे असते आणि या दिवसात रोज एक लाख भाविक येथे येतात.

shani
कानपूर येथील रॉबी शर्मा यांनी देशात बुजबुजलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून भ्रष्ट मंत्र विनाशक शनी मंदिर बांधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशातील भ्रष्टाचार दूर करणे कुणाच्याच आवाक्यात नाही. एखादी दैवी शक्तीच त्यासाठी हवी. शनी हा न्यायनिवाडा करणारा देव असल्याने भ्रष्टाचार संपविण्यासाठी त्याचे मंदिर बांधले आहे. येथे शनीला फूल, नैवैद्य कांहीही देण्याची परवानगी नाही तसेच भ्रष्टाचारात आघाडीवर असणार्‍या क्षेत्रातील म्हणजे न्यायाधीश, नेते, खासदार आमदार, मंत्री, पोलिस यांना या मंदिरात प्रवेशच करता येत नाही.

Leave a Comment