केंद्र सरकार देणार गरिबांना ६.५% दराने व्याजदराने गृहकर्ज

home-loan
नवी दिल्ली- ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने सुरू केली. शहरी भागातील गरिबांना परवडतील अशी घरे घेता यावीत म्हणून गृहकर्जाच्या व्याजदरात भरीव सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अल्प उत्पन्न गट आणि झोपडपट्टीवासीयांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ६.५० टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्याची मंत्रीस्तरीय समितीची शिफारसही स्वीकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरी गरिबांना प्रत्येकी २.३० लाख रुपयांपर्यंतचा फायदा होणार असून त्यामुळे मासिक हप्ता २,८५२ रुपयांनी कमी होणार आहे. सध्या १०.५० टक्के व्याजदराने १५ वर्षे मुदतीसाठी घेतलेल्या ६ लाख रुपये गृहकर्जाचा मासिक हप्ता ६६३२ रुपये येतो. ६.५० टक्के व्याजदर आकारणीच्या निर्णयामुळे हा मासिक हप्ता ४,०५० रुपये होणार असून शहरी गरिबांना दरमहा २५८२ रुपयांचा थेट फायदा होणार आहे.

Leave a Comment