दुबई: व्हॉट्स अॅपवर संभाषण करताना आपल्या मित्राची शपथ घेतल्याबद्दल युवकाला तब्बल ६८ हजार डॉलर्सचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयांनी केलेला दंड किरकोळ असल्याची टिपण्णी करीत संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश दिले आहेत.
व्हॉट्स अॅपवर मित्राची शपथ घेणा-याला ६८ हजार डॉलर्स दंडाची शक्यता
व्हॉट्स अॅपवर आपल्या एका सहका-याने आपली शपथ घेतली आणि आपल्याला धमकीही दिली, अशी तक्रार अमिरातीतील एका युवकाने दुबई पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार चौकशी करून संबंधित युवकावर स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. खालच्या दोन न्यायालयांनी या युवकाची धमकी देण्याच्या गुन्ह्यातून मुक्तता केली. मित्राची मात्र शपथ घेऊन माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केल्याबद्दल त्याला ३ हजार दिरहाम (सुमारे ८०० डॉलर्स) दंडाची शिक्षा सुनावली. मात्र अमिरातीमध्ये नुकत्याच अमलात आणण्यात आलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात २ लाख ५० हजार दिरहाम (६८ हजार डॉलर्स) दंड आणि/ अथवा कारावास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कराय्दाचा आधार घेऊन फिर्यादी तरुणाने अमिरातीच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादीची बाजू उचलून धरली असून माहिती तंत्रज्ञानविषयक नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दंडाची रक्कम कायद्यानुसार असली पाहिजे, असे अपीलावरील सुनावणीत नमूद केले आहे.