डिसेंबरमध्ये इस्रोची सूर्यावर स्वारी

isro
अहमदाबाद – सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इस्रोने जीएसएलव्ही मार्क-३ हा प्रक्षेपक डिसेंबर २०१६ पर्यंत प्रक्षेपित करण्यात येईल, अशी माहिती इस्रोचे संचालक ए. एस. किरण कुमार यांनी दिली.

सध्या सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या आदित्य-१ या उपग्रहाच्या बांधणीचे कामही इस्रोमध्ये वेगात सुरू आहे. येत्या चार वर्षांमध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल. इस्रोने सध्या जीएसएलव्ही मार्क-३ च्या प्रक्षेपणावर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क सॅटेलाईटची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सार्क देशांनी अवकाश मोहिमांमध्ये भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीनेही मंगळयान मोहिमेबाबत चर्चा केल्याचे कुमार यांनी सांगितले. अरब देश चांद्रयान मोहिमांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे कुमार म्हणाले. तसेच दक्षिण कोरिया उपग्रहीय साधनांबाबत सहयोग करण्याची शक्‍यता आहे.

Leave a Comment