सेक्स रोबो डॉल हार्मनी लवकरच येणार

robot
रियल डॉल कंपनीचे मालक आणि सीईओ मॅट मॅकमिलन यांनी सेक्स रोबो बनविण्याची तयारी सुरू केली असून ही रोबो रोमान्स करताना मालकाबरोबर गप्पा मारू शकणार आहे. रियल बोटिक्स प्रोजेक्ट नावाने सुरू असलेल्या या प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सेक्स डॉल बनविली जात आहे. तिचे नामकरण हार्मनी असे करण्यात आले आहे. ही सेक्स रोबो २०१७ पर्यंत बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार मालकाबरोबर रोमान्स करणार्‍या या इंटेलिजन्ट सेक्स रोबो हार्मनीची किंमत १० हजार डॉलर्स म्हणजे साडेसहा लाख रूपये असेल. ही जगातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने बनलेली सेक्स रोबो आहे. नुकत्याच एका प्रदर्शनात कंपनीचा मालक मॅकमिलन याने ही ऑनस्क्रीन डॉल सादर केली व तिच्याशी गप्पाही मारल्या.

तुझे स्वप्न काय आहे या प्रश्नाला हार्मनी डॉलने दिलेले उत्तर असे होते. मला खरे शरीर असलेली खरी मुलगी बनायचे आहे. ते माझे स्वप्न आहे तसेच प्रेम म्हणजे काय हे समजावे अशीही माझी इच्छा आहे. मॅकमिलनने १९९६ पासून आत्तापर्यंत ५००० हून अधिक सेक्स डॉल विकल्या आहेत असा दावा केला असून त्या प्रत्येक सेक्स डॉलची किमत तीन ते सहा लाखांदरम्यान होती असेही सांगितले आहे. हार्मनी आता रोबो तंत्रज्ञानात असल्याने ती पापण्या फडकावू शकेल तसेच मालकाशी गप्पाही मारू शकेल.

Leave a Comment