पतंजलीच्या टू मिनिट नूडल्स लवकरच बाजारात

patanjali
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठतर्फे लवकरच टू मिनिट नूडल्स बाजारात दाखल होत आहेत आणि विशेष म्हणजे त्यात अजिनोमोटो आणि शिसे या आरोग्यास घातक असलेल्या पदार्थांचा वापर अजिबात केला गेलेला नाही. रामदेवबाबांनी हरियानात बोलताना ही माहिती दिली असून ते म्हणाले की ओटस व मुलासाठी पॉवर व्हिटा यावर काम सुरू करण्यात आले आहे. येत्या १ ते २ महिन्यात या नूडल्स बाजारात येतील आणि त्याही दोन मिनिटांतच तयार होतील.

रामदेवबाबांच्या पतंजली योगपीठाद्वारे विविध प्रकारची ५०० उत्पादने केली जातात. बाबांच्या मते आज बाजारातील किमान १०० उत्पादने आरोग्यास हानीकारक आहेत आणि त्यांचीही तपासणी केली गेली पाहिजे. मैदा, साखर आणि मीठ हे पांढरे विषच आहे त्यामुळे आमच्या उत्पादनांत या वस्तूंचा वापर केला जात नाही. आम्ही फायदा मिळविण्यासाठी व्यापार करत नाही तर पदार्थाची गुणवत्ता आणि किंमती योग्य ठेवूनही जो नफा उरतो तो गरीबांसाठी औषध, उपचार, शिक्षण व राहण्याची सुविधा पुरविण्यात खर्च करतो.

आमच्या उत्पादनांमागे विदेशी उत्पादनांना आरोग्यपूर्ण, स्वदेशी पर्याय देणे हाच एकमेव हेतू आहे व त्यामुळेच आमच्या दर्जेदार उत्पादनांच्या किंमतीही सर्वसामान्यांना सहज परवडतील अशा ठेवल्या गेल्या आहेत.

Leave a Comment