ताजमहल बघायला येणाऱ्या पर्यटकांना मोफत वाय-फाय सेवा

tajmahal
आग्रा- माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजमहलमध्ये आता पहिल्या अर्ध्या तासासाठी पर्यटकांना मोफत वाय-फाय सेवा मिळणार असून तीस मिनिटानंतर त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले आहे.

बीएसएनएल द्वारे १०० एमबीपीएसच्या स्पीडने वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. याआधी वाराणसी येथील दशाश्वमेध घाट आणि शितला घाट येथे वाय-फाय बसविण्यात आले आहेत. भविष्यात फतेहपूर सिक्री आणि खजुराहो, जगन्नाथ पुरी येथे वायफाय बसविण्यात येणार आहेत. डिजीटल इंडियाच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी वाय-फाय बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कमध्ये ९८१ कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत. यामध्ये १४,४७४ खेडी आहेत.

Leave a Comment