स्मार्टफोन धारकांसाठी रस्त्यात वेगळी लेन

beljium
अँटवर्प- बेल्जियमचे हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले अँटवर्प आता निराळ्या कारणानेही प्रसिद्धीस येऊ पाहते आहे. या शहरातील रस्त्यावर स्मार्टफोन धारकांसाठी वेगळ्या लेन केल्या गेल्या आहेत आणि हे काम स्मार्टफोन कंपन्यांनीच पुढाकार घेऊन केले आहे.

या मागचे कारण असे सांगितले जात आहे की लोकांना स्मार्टफोनशिवाय तर चालणार नाही मग रस्त्यातून जातानाही त्यांना फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, मेसेजिगचा निर्वेध वापर करता यावा, त्यामुळे अन्य पादचार्‍यांना अडचण होऊ नये आणि स्मार्टफोनची सुरक्षाही राखली जावी असा उद्देश आहे. रस्त्यातून जाताना स्मार्टफोन वापर करणारे अनेकदा आपल्याच नादात समोरून येणार्‍यांना धडकतात. त्यातून अपघात होतात आणि अनेकदा स्मार्टफोन हातातून पडून फुटतात. रस्त्यावरच वेगळी लेन तयार करण्यामुळे या सर्वच घटना टळू शकणार आहेत.

मात्र स्मार्टफोनधारकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही . त्याच्या म्हणण्यानुसार या लेन फारच निमुळत्या आहेत. रस्त्यात स्मार्टफोनचा सतत वापर करणार्‍यांची संख्या मोठी असल्याने या लेनमध्येही गर्दी होणारच आणि घडायचे ते अपघात घडणारच मग रस्ते उगीचच अरूंद करण्यात मतलब काय?

Leave a Comment