लंडनच्या शाळेत मुलींच्या मिनीस्कर्टवर बंदी..!

school
लंडन – इंग्लंडसारख्या प्रगतशील देशात एका शाळेने मुलींनी मिनीस्कर्ट घालू नये असा फतवा काढला आहे.

मुलींच्यासाठी नवीन नियमावलीचे फर्मानच सेंट मार्गारेट या शाळेने काढले आहे. त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी “मेक-अप‘ करावा अशा सूचना दिल्या आहेत. मुलींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, यासाठी शाळेने ही नियमावली जारी केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे मुलींच्या पालकांचा मात्र शाळेच्या या नियमावलीला विरोध आहे. अशा प्रकारची जाचक नियमावली म्हणजे मुलींच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचे पालकांनी म्हटले आहे. दुसरीकडे मुलींचा बराच वेळ पोशाखाची निवड करण्यात आणि मेक-अप करण्यात जात असल्याने त्यांचे अभ्यासाकडे लक्ष राहात नाही, असा दावा शाळेने केला आहे.