नांदेडात संस्कृती रक्षकांची तरुण-तरुणीला मारहाण

whatsapp
नांदेड – जिल्ह्यातील अर्धापूर येथे अज्ञात १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी एका शेतात गप्पा मारत बसलेल्या मित्र-मैत्रिणीला मारहाण केली. ते एवढेच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडिओ व्हॉट्स अप वर टाकल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एक मुलगा आणि मुलगी अर्धापूर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर एका उसाच्या शेतात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अज्ञात दहा ते बारा जणांचे टोळ्के आले आणि त्यांनी दोघानाही मारहाण करित दोघांचाही मोबाईल काढून घेतला. त्यानंतर मारहाण केलेली व्हिडिओ क्लिप व्हॉट्स अप वर टाकून बदनामी केली. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञात बारा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment