अमेरिकन मोटरसायकलचा इतिहास तसा फार जुना आहे. एकेकाळी पियर्स ऑटोमोबिलने अमेरिकेच्या रस्त्यावर राज्य केले आहे आणि हीच कंपनी आपले जुने वैभव पुन्हा एकदा जगासमोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील सर्वात दणकट आणि ताकदवान बियानविल लिगसी बाईक कंपनीने सादर केली असून तिची किंमत आहे २.५०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजे १ कोटी ६० लाख रूपये.
दीड कोटींची दणदणीत बियांविल लिगसी बाईक
चार सिलेंडरच्या या बाईकचा लूक अगदी मॉडर्न आहेच पण तिला खास सस्पेन्शन दिले गेले आहे. ही सर्वसाधारण स्पोर्टस, क्रूझर वा रेस बाईक नाही मात्र आजच्या मोटरसायकल्सच्या तुलनेत तिचे डिझाईन खूपच वेगळे आहे. १६५० सीसीची चार एमव्ही इंजिन सह असलेल्या या बाईकचे सस्पेन्शन अन्य बाईकप्रमाणे केवळ स्प्रिंग कॉबिनेशन नाही तर सारे सस्पेन्शन सेंट्रली लोकेटेड कंपोझिट लिप स्प्रिंगवर दिले गेले आहे. यामुळे चालकाचे वजन सेंट्रलाईज होण्यास मदत होते आणि हंडलिंग अधिक सहजतेने करता येते असा कंपनीचा दावा आहे.
या मोटरसायकलचे सीट घोड्यावर घातल्या जाणार्या जीनप्रमाणे आहे यामुळे रायडरला घोडेस्वारी करत असल्याचा अनुभव घेता येतो मात्र हे सीट कस्टमाईज करूनही चालकाच्या सोयीप्रमाणे बनवून घेता येते.कंपनीने आत्तापर्यंत फक्त तीन प्रोटोटाईप बनविले आहेत. टायटेनियम कार्बन फायबर तसेच लेदर व महोगनीचा वापर यासाठी केला गेला आहे. बाईक तयार करण्यास तीन वर्षे लागली असून त्याचे लाँचिंग इंग्लंड येथे २५ ते २८ जून दरम्यान होत असलेल्या गुडवुड फेस्टीव्हलमध्ये केले जाईल असे सांगितले जात आहे.