तीन सेंटीमीटर नैऋत्यकडे सरकला माउंट एव्हरेस्ट !

mount-everest
पेइचिंग – जगातील सर्वोच्च हिमशिखर अशी ओळख असलेला एव्हरेस्ट पर्वत गेल्या एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या महाविनाशी भूकंपाच्या परिणामाने आपल्या मूळ स्थानावरून चक्क तीन सेंटीमीटर नैऋत्यकडे सरकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याबाबतचे वृत्त चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. एप्रिलच्या अखेरीस नेपाळला ७.९ इतक्या रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपात १५ हजारावर नागरिकांचा मृत्यू झाला होता. भूकंपाच्या प्रभावाने एव्हरेस्टवरही हिमस्खलन झाले होते. यात २२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाने एव्हरेस्टचा पायवाच हलवून ठेवला. यामुळे हा महाकाय एव्हरेस्ट आपल्या मूळ स्थानावरून तीन सेंटीमिटर नैऋत्येकडे सरकला आहे, असे ‘चायना डेली’ च्या वृत्तात म्हटले आहे. नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्व्हे, मॅपिंग ऍण्ड जिओ इन्फॉर्मेशनच्या अहवालाचा हवाला देत हे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

Leave a Comment