६२५०० डॉलरमध्ये आईनस्टाईनच्या पत्राचा लिलाव

albert
लॉस एंजेलिस : १९४५ मध्ये आपल्या मुलाला अल्बर्ट आईनस्टाईनने एक पत्र लिहिले होते ज्यात सापेक्षता सिद्धांत आणि अणूबॉम्ब यांतील त्याने सांगितले होते. ६२५०० डॉलरमध्ये त्या पत्राचा लिलाव झाला आहे. आईनस्टाईनने हे पत्र जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता त्यावेळी लिहिले होते.

आईनस्टाईनच्या २७ पत्रांचा लिलाव ‘प्रोफाईल्स इन हिस्टरी’मध्ये झाला. ज्यातून ४२०००० डॉलर इतकी रक्कम मिळाली आहे. लिलाव झालेल्या पत्रांपैकी २ पत्र आईनस्टाईनने १९४०च्या दशकात लिहिलेली होती. या पत्रांमध्ये त्याने आपले ईश्वराबद्दलचे विचार लिहिले आहेत. या पत्रांचा अनुक्रमे २८१२५ आणि ३४३७५ डॉलरमध्ये लिलाव झाला. अन्य पत्रांमध्ये त्याने बऱ्याच गोष्टींवर आपली मते मांडली आहेत.

विक्रेत्याने बरीच वर्षे ही पत्र जमवली असून त्याने आपली ओळखही लपवली आहे. ही पत्र वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केली आहेत, अशी माहिती ‘प्रोफाईल्स इन हिस्टरी’चे संस्थापक जोसेफ मॅडालेना यांनी दिली आहे.

Leave a Comment