विंटेज लूक व्हेस्पा एम्पोरियो अर्मानी सादर

vespa
विंटेज लूकच्या वाहनांची क्रेझ असलेल्या लक्षावधी लोकांसाठी व्हेस्पा ने शानदार व्हेस्पा ९४६ एम्मोरियो अर्मानी स्कूटरची लिमिटेड एडिशन बाजारात आणली आहे. जार्जो अर्मानी ब्रांडला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि पिओजिओ ग्रुपने १३० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अर्मानीने व्हेस्पाच्या सहकार्याने दुचाकीची ही शानदार रेंज सादर केली आहे.

पूर्वीच्या व्हेस्पाप्रमाणेच प्रथमदर्शनात सिंगल सीटर वाढणारी ही स्कूटर आकर्षक रंगात तर आहेच पण पाहताक्षणीच ती व्हिेंटेज फिलिंगही देते. गाडीला ब्राऊन कलरचे लेदर सीट दिले गेले आहे. स्कूटरची बॉडी जुन्या लूकची असली तरी तिला हायटेक इलेक्ट्रोनिक ड्रायव्हिंग कंट्रोल्स दिली गेली आहेत त्यामुळे तरूणाईलाही ती आपलीशी वाटेल असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरला मोबाईल, इंटरनेट कनेक्टीव्हीटी आहे शिवाय फोरस्ट्रोक इलेक्ट्रोनिक इजेक्शन इंजिन, १२ इंची चाके आहेत.

स्कूटरसोबत बॅग्ज, हँडग्रिप्स, प्रोटेक्टीव्ह कव्हर, हेल्मेट सारख्या ऑप्शनल अक्सेसरीजही ग्राहक घेऊ शकणार आहे आणि या अॅक्सेसरीज स्कूटरच्या रंगाला मॅचिंग आहे. हेडलाईटवर ईगल लोगो असून ही स्कूटर निवडक शहरांतच १५ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे.

Leave a Comment