बदलली तात्काळ आरक्षणाची वेळ

reservation
नवी दिल्ली : आजपासून तात्काळ कोट्यातून तिकीट आरक्षित करण्याची वेळ बदलण्यात आली असून रेल्वेतर्फे एक जूलैपासून हा बदल करण्यात येणार होता. मात्र, आता तो १५ जूनच्या मध्यरात्रीपासून बदल लागू होणार आहे. तिकीट व्यवस्था आणि ऑनलाईन आरक्षणावरील ताण कमी करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे.

वातानुकूलित आणि विना वातानुकूलित श्रेणीतील तिकिटांच्या आरक्षणाची वेळ बदलण्यात आली आहे. जुन्या पद्धतीनुसार प्रवासाच्या एक दिवस अगोदर सकाळी १० वाजता आरक्षणाला सुरुवात होत होती. मात्र, आता नवीन बदलानुसार १५ जूनच्या मध्यरात्रीपासून वातानुकूलित आणि विना वातानुकूलित श्रेणीतील तिकिटांच्या बुकिंगची वेळ वेगळी असणार आहे. वातानुकूलित श्रेणातील तिकिट १० वाजता तर विना वातानुकूलित श्रेणीतील तिकिट ११ वाजल्यापासून आरक्षित करता येणार आहे. सर्व्हरवरील ताण कमी करणे आणि लोकांना होणा-या त्रासापासून वाचविण्यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Leave a Comment