पेट्रोल ६४ पैशांनी महाग, तर डिझेल १.३५ रुपयाने स्वस्त

petrol
नवी दिल्ली : पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली असून ६४ पैसै प्रति लिटर प्रमाणे ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असून १.३५ रुपयाने डिझेल स्वस्त झाले आहे. हे सुधारित दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त झाले आहे. मागील चार महिन्यांमधील पेट्रोलचे दर वाढण्याची ही चौथी वेळ आहे. या पूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली होती. त्या वेळी पेट्रोलचे दर ३ रुपये १३ पैसे प्रति लिटर प्रमाणे तर डिझेलच्या दरात २ रुपये ७१ पैशांनी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल दिवसेंदिवस महाग होत असल्याने सर्वसामान्यांचे या महागाईने कंबरडे मोडले आहे.

Leave a Comment