डेलचा सर्वाधिक स्लीम टॅब्लेट लाँच

dell
पर्सनल कॉम्प्युटर व लॅपटॉप उत्पादनातील अग्रणी टेल ने डेल व्हिनस ८ ७००० हा टॅब्लेट नुकताच लाँच केला आहे. हा टॅब्लेट जगातील सर्वात स्लीम टॅब्लेट असल्याचा कंपनीचा दावा आहे आणि त्याची किमत आहे ३४९९९ रूपये. भारतात तो ईबे ऑनलाईन शॉपिग वेबसाईटवर खरेदी करता येईल.

केवळ ६.१ मिमी जाडी असलेला हा टॅब्लेट अँड्राईड लालीपॉप ५.० ओएससह आहे. त्याला ८.४ इंची ओएलईडी स्क्रीन, १६ जीबी इंटरनल मेमरी ती ५१२ जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा दिली गेली आहे. टॅब्लेटसाठी खास कॅमेरा बॅक पॅनलवर आहे. ८एमपीचा हा ड्युअल थ्रीडी कॅमेरा रेकॉर्डींग साठी अतिशय योग्य आहे. त्यासाठी रियलसीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. शिवाय २ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून मिराकास्ट, वायफाय, जीपीएस, एजीपीएस, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी कनेक्टीव्हीटी ऑप्शन आहेत.

Leave a Comment