अनिवासी भारतीयाने बनविले सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र

technic
न्यूयॉर्क – सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत भारतीय वंशाचे संशोधक नील सवानी यांनी विकसित केल्यामुळे, सौरवादळाची सूचना किमान २४ तास आधी मिळून संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे. .

अशाप्रकारच्या वादळांमुळे जीपीएस यंत्रणा प्रभावित होण्यासह दळणवळणाची यंत्रणा कोलमडण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर वायू उत्सर्जित झाल्याने ‘कोरोनल मास इजेक्शन’ हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन आपल्या दैनंदिन वापराच्या दळणवळण यंत्रणेत बिघाड होतो. मात्र, या यंत्रणेमुळे संपर्क यंत्रणा प्रभावित होत असल्याने हा शोध महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सावनी यांच्या या उपकरणाची सध्या चाचणी सुरू असून, सौरवादळामुळे निर्माण होणार्‍या चुंबकीय क्षेत्राचाही अभ्यास करण्यात येत आहे. वादळ निर्माण होण्याच्या प्रक्रियेदरम्यान या चुंबकीय क्षेत्रात होणार्‍या बदलांच्या नोंदी यंत्राच्या माध्यमातून करता येणार आहेत. या यंत्रणेचा सर्वाधिक फायदा लष्कर, हवाई वाहतूक सेवा आणि दूरसंचार सेवा कंपन्यांसह दळणवळणाच्या क्षेत्रातील यंत्रणांना होणार आहे.

Leave a Comment