चंद्रावरही होतात भूकंप

moon
पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरही भूकंप होतात असे भारतीय संशोधक दलाने केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या जमिनीखालीही टेक्टोनिक प्लेट आहेत आणि सरकताना एकमेकांवर धडकतात व त्यातून भूकंप होतात असे पुरावे मिळाले आहेत. चांद्रयान १ ने पाठविलेल्या प्रतिमांचा अभ्यास करताना हे दिसून आले आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पर्यावरण विभागातील भूगर्भ संशोधक प्रो. सौमित्र मुखर्जी आणि त्यांच्या विद्यार्थीनी प्रियदर्शनी सिंग यांनी चांद्रयानाकडून पाठविल्या गेलेल्या प्रतिमांचे विश्लेषण केले आहे.

मुखर्जी म्हणाले, चांद्रयानाने पाठविलेल्या प्रतिमा अभ्यासताना दक्षिण ध्रुव क्षेत्रातील आकडेवारीवरून चंद्रावरील टेक्टॉनिक प्लेटच्या हालचालींचे पुरावे हाती आले आहेत. त्यांचा या संदर्भातला लेख नेचर इंडिया सह अन्य ३ संशोधक पत्रिकात प्रसिद्ध झाला आहे.

Leave a Comment